वाघळापाडा येथे आरोग्य तपासणी शिबीर

0

नवापुर। तालुक्यातील मौजे वाघळापाडा येथे गृप ग्रामपंचायत नागझरी अंतर्गत 17 व 18 ऑगस्टपर्यत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबीराचे उद्ाटन माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत यांचाहस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.उल्हास वसावे, सरपंच तथा युनियन अध्यक्ष राहुल गावीत, नागझरी सरपंच रामकु गावीत, उपसरपंच नागझरी हेदाबाई गावीत, सरपंच सुरज गावीत, कृउबा संचालक विनायक गावीत, बीडीओ नंदकुमार वाळेकर, कारेघाट सरपंच दिलीप गावीत, सरपंच बंधारपाडाचे सरपंच अनिल गावीत, डॉ.विपुल वळवी, डॉ.किशोर गावीत, डॉ. अमित मावची, डॉ. युवराज पराडके, डॉ. अजय कुंवर, डॉ.शितल रोय, डॉ.गुंतीलाल गावीत, डॉ. अमोल वळवी, डॉ. जितेश गावीत, डॉ. विश्वास नाईक, डॉ. स्मिता वसावे, डॉ.विपुल गावीत, डॉ.प्रशांत गायकवाड, डॉ. विजय जोधळे, व्यवस्थापक अथीली (मनिपुर) शमुवेल गावीत, नितिन विचुरे, युवक कॉग्रेसचे सचिव रवि गावीत आदी उपस्थित होते.

चांगल्या आरोग्यासाठी फळांचे सेवन करा – डॉ. उल्हास वसावे
यानंतर डॉ.उल्हास वसावे म्हणाले की. ज्या समाजामुळे आम्ही मोठे झालो आहे. त्या समाजाची सेवा करणे आमचे कर्तव्य आहे फिरते दवाखान्याची ही गाडी महिण्यातुन 2 वेळा आपल्या गावात येणार आहे. जी काही सेवा आम्हाला करता येईल ती आम्ही करणार आहोत.जो पर्यत तुमचा आजार आम्हाला सांगणार नाही तोपर्यत तो बरा होणार नाही, घाबरु नका आमचा जवळ मनमोकळ्या प्रमाणे बोला. आम्ही तुम्हाला 15 दिवसाचे औषधे देऊ ते तुम्ही बरोबर घेणार अशी मी आशा बाळगतो. आम्हाला समजले आहे की या भागामध्ये कुष्ठरोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. आदिवासी समाजात आरोग्य हे पहिले फार चांगले राहत होते पंरतु कालांतराने खेड्यापाड्ात जास्त ग्रामस्थ आजारी पडतांना दिसत आहे. यासाठी रोज व्यायम करणे, आहारामध्ये फळे, दुध, पालीभाजाचे सेवन जास्त उपयोग करा. फिरते दवाखान्याचे आमच्याकडे 6 व्हँन आहेत. यामध्ये सर्व औषधे उपलब्ध आहे, असे सांगितले.

रक्तदानाबाबत गैरसमज दुर करा – भरत गावीत
कार्यक्रमाची सुरुवात तपासणी शिबीर फित कापुन माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत यांनी उद्घाटन केले. उद्घाटक भरत गावीत म्हणाले की, ग्रामपंचायमार्फत भरपुर कार्यक्रम होतात. पण जिल्हात ही पहिली ग्रामपंचायत आहे की ती आरोग्य तपासणी कार्यक्रम घेत आहे. आपल्याला मोठे आजार होतात तेव्हा आपण डॉक्टराकडे जातो. असे करु नका नंदुरबार व नवापुर या भागात 68 टक्के आदिवासी समाज आहे. या समाजाचा तरुणांनी रक्तदान केले पाहीजे, अशी मी विनंती करतो रक्तदान हे कार्य महान आहे. रक्तदान केल्याने रक्त कमी होत नाही. हा गैरसमज मनातून काढून टाका, 24 तासामध्ये परत आपले रक्त बनत असते. आपल्या भागातमध्ये कुपोषणाचे प्रमाण हे फार मोठे आहे. एकुण 329 बालके कुपोषीत आहेत, आपल्या समाजाने चांगले नियोजन केले तर या कुपोषनाला हद्दपार करु शकतो समाजामध्ये मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 झाल्याशिवाय लग्न करु नका. कमी वयात लग्न केले तर शरीराची वाढ होत नाही व कुपोषणाचे प्रमाण वाढते. या ग्रामपंचायतीने हे आरोग्य शिबीर ठेवले आहे, यांचा उपयोग चांगला करा व वेळेवर औषधे घ्या, आपले शरीर चांगले राहील तर आपण चांगली शेती करु सर्व चांगले आहे. पण शरीर चांगले राहले नाही तर ते सर्व काय कामाचे आपल्या आरोग्याची काळाजी अशा आरोग्य शिबीरातुन करुन घ्या, नागझरी ग्रामपंचायतचा आदर्श सर्व ग्रामपंचायतीने घेतला पाहीजे असे सांगितले.

तज्ञ डॉक्टरांंची गरज
यानंतर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर म्हणाले की हा कार्यक्रम महत्वाचा आहे. वेगवेगळ्या आजाराचा तपासणीसाठी आपल्याला सुरत, नाशिक, व्यारा, अशा शहरात जावे लागते. परंतू आपल्या या ग्रामपंचायततर्फे येथेच तज्ञ डॉक्टर आले आहे तर आपल्या आजारीची पुर्ण माहीती यांना दया व आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे सांगितले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक विकास गावीत यांनी केले तर आभार ग्रामसेवक विजय गावीत यांनी मानले. तसेच यावेळी 952 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नंदुरबार जिल्हात नवापुर तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायत मध्ये वाघळापाडा या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.