वाघाचा निलगायीवर हल्ला ; निलगाय जखमी

0

मुक्ताईनगर- डोलारखेडा गावाजवळ पट्टेदार वाघाकडून निलगयी ची शिकार करण्याचा प्रयत्न झाला. जीव वाचविण्याच्या धळपडीत जखमी नीलगाय डोलारखेडा गावात घुसल्याची घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. जखमी नीलगायीला ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या सुपूर्द केले. उपचार करून तिला नंतर जंगलात सोडण्यात आले. वढोादा वनहद्दीत डोलारखेडा गावाच्या खालच्या बाजूस जंगलात नीलगायीची शिकार करण्यास पट्टेदार वाघ तिच्यामागे लागला तर वाघाने निलगायीच्या मागील उजव्या पायावर पंजा मारून जबर जखमी केले. वाघाच्या तावडीतून सुटका करीत जखमी नीलगाय बेभान होत डोलारखेडा गावात येऊन थबकली. आश्रयाच्या शोधात नीलगाय जवळच गावचे पोलीस पाटील भागवत नागो इंगळे यांच्या कंपाउंडमधून थेट घरात घुसली. ग्रामस्थांनी या जखमी वन्यप्राण्याला पकडून जवळच वनविभागाच्या कार्यालयात आणून वनविभागाच्या सुपूर्द केले. तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी पाचारण करून तिच्यावर उपचार करण्यात आले व परत जंगलात सोडण्यात आले.