पिंपरी-चिंचवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वच्छ व स्वस्थ भारत पंधरवड्याचे आयोजन केले होते. याचा एक भाग म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने महाविद्यालयाची स्वच्छता करण्यात आली. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.
स्वच्छ व स्वस्थ भारत पंधरवडा या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. तसेच रस्त्याकडील, मैदानावरील गवत, दगड काढले. ओला व सुका कचरा वेगळा केला. एक ट्रॉलीएवढा कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये 110 विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन प्रा. पुणेकर, प्रा. ओव्हाळ, श्री. सोळंकी यांनी केले.