पाचोरा । पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथे शेतकरी शेतात शेती काम करीत असतांना डि.पीला ताण देणार्या तारेला स्पर्श झाल्याने तीस वर्षीय तरूण शेतकरी जागीच ठार झाला. सदरचा प्रकार वीज वितरण विभागाच्या भोंगळ व हलगर्जीपणाच्या गलथान कारभारामुळे झाल्याचे ह्या परिसरातील शेतकर्यांनी संतप्त भावना व्यक्त करून या परिसराचे विजेचे कामकाज पाहणार्या अभियंत्यासह वायरमनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात याव्या, अशा चर्चा होत्या. तर घटनेची माहिती मिळताच पाचोरा रूग्णालयात मयतास पाहण्यासाठी व त्यांचे नातेवाईकांचे व गावकर्यांचे सांत्वन करण्यासाठी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व पदाधिकार्यांनी उपस्थिती दिली.
आकस्मात मृत्यू झाल्याने परीसरात हळहळ
पाचोरा तालुक्याचा वाघुलखेडा शिवारात दुपारी साडेचार वाजे सुमारास संभाजी विठ्ठल पाटील (वय-32) हा तरूण शेतकरी शेतात शेती काम करीत होता. शेताजवळील रोहित्र (डि.पी.) हा ताण देणार्या तारेत विजेचा प्रवाह असल्याने त्या शेतकर्या अनावधानाने त्या तारेस स्पर्श झाल्याने संभाजी ह्यास विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने तो जागीच मरण पावला. घटनेची माहिती परिसरात पसरताच गावकरी व शेतकर्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. विजेच्या शॉकने गंभीर अवस्थेतील शेतकर्यास पाचोरा ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तो मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेने या परिसरात वीज वितरण विभागाच्या भोंगळ व हलगर्जी कारभाराबाबत प्रचंड नाराजी व संताव वाघुलखेडा गावकरी व शेतकरी व्यक्त करीत होते. तसेच मागील काही महिन्यात पाचोरा तालुक्याचा विविध गावांमध्ये विजेच्या शॉक लागून वीज शेतकरी दगावल्याच्या घटना घडल्याचेही शेतकर्यांनी सांगितले.