वाघूर नदीवर साठवण बंधार्‍यासाठी सर्वे

0

आमदार संजय सावकारेंचा पुढाकार ; शेतीसह पाण्याचा प्रश्‍न सुटणार

भुसावळ:- नदी पुर्नजीवन योजनेतंर्गत वाघूर नदीवर साठवण बंधारे निर्माण करण्याबाबत नुकताच सर्वेक्ष करण्यात आला. यासाठी आमदार संजय सावकारे यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या सूचनेवरून हा सर्वे करण्यात आला. मृद व जलसंधारण विभागाचे आर.टी.पाटील, सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात नदीवरील बंधार्‍यासाठी सर्वे करण्यात आला. ही कामे झाल्यास भुसावळ तालुक्यातील वराडसीम, बेलव्हाय, सुनसगाव, वांजोळे, गोंभी, साकेगाव या गावांचा तसेच जळगाव तालुक्यातील निमगाव, बेळी, नशिराबाद, जळगाव खुर्द या गावांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकार्‍यांसोबत आमदर सावकारे यांचे प्रतिनिधी किरण चोपडे, भालचंद्र पाटील, बेलव्हाय सरपंच जितेंद्र खाचणे, गोंभीचे प्रमोद पाटील, वांजोळ्याचे नरेंद्र पाटील तसेच नशिराबाद जि.प.गटाचे सदस्य लालचंद पाटील उपस्थित होते. सर्वे सुरू असताना परीसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित देत सर्वेबाबत माहिती जाणून घेतली.