रावेर : तालुक्यातील वाघोड येथे 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. नम्रता कुंभार (22) असे मयत विवाहितेचे नाव आहे. मयत नम्रता हिच्या पश्चात नऊ महिन्यांची मुलगी असल्याचे समजते. याबाबत रावेर पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.