रावेर । तालुक्यातील वाघोड येथे विहीरिच्या कामावर गेलेल्या युवकाचा दोर तुटून मृत्यु झाल्याची घटना शुक्रवार 14 रोजी दुपारी घडली. वाघोड़ येथील रहीवासी अशोक चांभार (वय 25) हा विहीरीचे दुरुस्तीचे तसेच बांधकाम करीत असतो.
शुक्रवार 14 रोजी मोरगाव येथील एका शेतकर्याच्या विहीरीवर कामासाठी गेला असता बांधलेले दोरखंड तुटल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत अशोक याच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.