मुंबई-माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन कधी झाले यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. १६ ऑगस्टला वाजपेयी यांचे झाले. मात्र त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली होती, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
वाजपेयी यांचा श्वास साधारण १२-१३ ऑगस्टपासून मंदावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्य दिनादिवशीच्या भाषणात अडथळा येऊ नये, स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको या विचाराने वाजपेयी यांनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला किंवा त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली, अशी शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे.
‘सामना’ या वृत्त पात्राती अग्रलेखातून ही शंका व्यक्त करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला सांयकाळी दिल्लीतील एम्स रूग्णालयाने वाजपेयींच्या निधनाची घोषणा केली होती. त्यांनी आपल्या लेखातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
स्वराज्य म्हणजे काय हे जनतेपेक्षा आपल्या राज्यकर्त्यांनी आधी समजून घेतले पाहिजे. वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाले. पण त्यांची प्रकृती १२-१३ ऑगस्टपासूनच बिघडली होती. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय शोक नको आणि लाल किल्ल्यावरील तिरंगा अर्ध्यावर उतरवायला नको, तसेच पंतप्रधान मोदींचेही लाल किल्ल्यावरून भाषण व्हायचे होते. या राष्ट्रीय विचाराने वाजपेयींनी १६ ऑगस्ट रोजी जगाचा निरोप घेतला अशी घोषणा करण्यात आली असे आरोप करण्यात आले आहे.