40,000 of woman’s wallet was extended while boarding the bus: incident at Bhadgaon bus stand भडगाव : पोळा सणाला माहेरी भावाकडे निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची पोत चोरट्यांनी बसमध्ये चढताना चोरट्यांनी लांबवली. भडगाव बसस्थानकात ही घटना 29 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा पोलिसांकडून शोध
भडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी इंदुबाई महादु देसले (रा. कळवाडी, ता.मालेगाव) या माहेरी वाडे येथे भावांकडे पोळा सणानिमित्त आयोजित यात्रेसाठी निघाल्या होत्या. 29 रोजी त्या वाडे-भडगाव बसने दुपारी भडगावात आल्या असता त्यांनी महिंदळे गावाला जाणार्या भडगाव-पारोळा बसमध्ये प्रवेश केला मात्र बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी 10 ग्रॅम वजनाची 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली. या प्रकरणी महिलेचे भाऊ लक्ष्मण पाटील यांनी भडगाव पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार विजय जाधव करत आहेत.