वाडे येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत लोकसेवा केंद्र कार्यालय, महिला सक्षमीकरण मेळावा, व्यावसायिक प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन.

भडगाव (प्रतिनिधी)— किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय सामाजीक संस्था पाचोरा आयोजीत महिला सक्षमीकरण मेळावा व व्यावसायीक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन वाडे येथे दि.२७ रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात आले होते. सुरुवातीस सरकार आपल्या दारी या शासनाच्या योजनांसाठीच्या लोकसेवा केंद्र कार्यालयाचे उदघाटन पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांचेसह मान्यवरांचे हस्ते फित कापुन करण्यात आले. सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. गोंडगाव येथील कल्याणी पाटील या चिमुकलीसाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर मान्यवरांचा सत्कार आयोजकांमार्फत करण्यात आला.

कृषी विभागाचे प्रविण पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली.

प्रास्ताविकात भडगाव महिला बचत गटाचे समन्वयक प्रशांत महाले यांनी महिलांना कर्ज वाटप करुन बचत गटाच्या माध्यमातुन सर्वांगीण विकास साधला जात आहे. यापुढेही वाडे येथील महिला बचत गटांना बँकेमार्फत १ कोटी रुपये कर्ज वाटप करण्याचे नियोजन असल्याचे सांगीतले. गोंडगावच्या प्रतिक्षा पाटील यांनी पी एम योजनेसह इतर योजनांची माहिती दिली. भडगाव

तहसिल कार्यालयामार्फत भास्कर शहाणे, विकास राठोड आदिंनी संजय गांधीसह योजनांची माहिती दिली.

गावातील काही बचत गटांच्या महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज वाटप चेक तसेच २ अपंग बांधवांना सायकलींचे वाटपही आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विधानसभा क्षेञ प्रमुख परशुराम माळी यांनी सरकार आपल्या दारी यासह शासनाच्या योजनांची माहिती दिली. अभाकार्ड योजना,आयुष्यमान भारत योजना कार्ड , ई श्रम कार्ड नोंदणी कॅम्प घेउन केली असुन कार्ड लाभार्थ्यांना मिळणार आहेत. लाभ घेण्याबाबत परशुराम माळी यांनी नागरीकांना आव्हान केले.यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील , शिवसेना उपजिल्हा प्रमुख डाॅ. विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन अंजली चव्हाण नगरदेवळा यांनी केले. वाडे येथील शोमेश्वर प्रतापसिंग राजपुत या गरीब कुटुंबातील मुलगा सीआरपीएफमध्ये नोकरीला लागल्याने शोमेश्वर राजपुत या मुलाचा सत्कार आमदार किशोर पाटील यांनी केला.

आमदार किशोर पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले कि, पाचोरा भडगाव मतदार संघात ७ जि. प. गटात आपण सरकार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत विविध शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा. विविध दाखले मिळावेत.यासाठी कार्यालय सुरु केलेले आहेत. या कजगाव वाडे गटात कजगाव व वाडे येथे हे दोन कार्यालय सुरु केलेले आहेत. गोरगरीब जनतेला शासनाच्या तहसिल विभाग, कृषी विभाग, जि. प. व पं. स. या विविध शासकीय विभागाच्या योजनांच्या लाभासाठी सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी नागरीक, महिलांना या लोकसेवा केंद्र कार्यालयाचा मोठा फायदा होणार आहे.या कार्यालयांमध्ये नागरीक, महिलांनी योग्य त्या कागदपञांसह अर्ज करावेत. या कार्यालयामार्फत प्रशासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातील.या कार्यालयामार्फत आपल्या सर्वांना योजनांचा लाभ मिळणार आहे. वाडे येथील या केंद्रात आमचे कर्मचारी व परशुराम माळी यांचेवर ही जबाबदारी राहणार आहे. सोबत गावातील महिला बचत गटाच्या सीआर पी घरोघरी जाऊन योजनांबाबत सर्वे करण्याचे नियोजन आहे. तरी नागरीकांनी या विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहनही आमदार किशोर पाटील यांनी केले. महिला बचत गटाच्या माध्यमातुन महिलांनी सक्षम राहण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातुन कर्ज उभारुन विविध व्यवसाय उभा करुन सर्वांगीण विकास होतांना दिसत आहे. याकामासाठी भडगाव महीला बचत गटाचे तालुका व्यवस्थापन अभियान कक्षाचे प्रशांत महाले यांचे चांगले अधिकारी म्हणुन महिला बचत गटांना अनमोल सहकार्य लाभत असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी प्रशंसा केली. मी बँकांनाही दम दिला आहे कि महिला बचत गटांना वेळोवेळी मागणीनुसार कर्ज उपलब्ध करुन दयावे. माञ महिला बचत गटांनी ज्या कामासाठी, व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे.त्याच कामासाठी, व्यवसायासाठी कर्जाचा सदुपयोग करावा. तरच यातुन प्रगती आहे. असेही शेवटी आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले.

व्यासपिठावर आमदार किशोर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शिवसेना जिल्हाउपप्रमुख डाॅ. विशाल पाटील, शेतकरी सहकारी संघाचे संचालक राजेंद्र परदेशी, स्विकृत संचालक भिमराव पाटील, हनुमान विकासोचे चेअरमन देविदास माळी, सरपंच रजुबाई पाटील, ग्रां. पं. सदस्या नलिनी माळी, मळगाव सरपंच गुलाब पाटील, लोणपिराचे सरपंच अशोक पाटील, बांबरुड प्र. ब. निंबा पाटील, युवासेनेचे राहुल पाटील, कजगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, बेलगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक यशवंत पाटील, जालींदर चित्ते, प्रकाश परदेशी, राजु गोमलाडु, कनाशीचे शरद पाटील, वाडे वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, महिंदळे सरपंच मोहन पाटील , निंभोरा प्रकाश पाटील, निंभोरा माजी सरपंच माधवराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक विश्वासराव पाटील, शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाअध्यक्ष विजय साळुंखे, वाडे यशवंत दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन गोपाल परदेशी, शिवसेना शाखा प्रमुख रविंद्र माळी,प्रभारी तालुका कृषी अधिकारी, डी. एस. पाटील, तलाठी संभाजी पाटील, ग्रामसेवक राठोड, यांचेसह मान्यवर उपस्थित होते.

आमदार किशोर पाटील यांचे हस्ते वाडे, मळगाव, बांबरुड प्र ब, सावदे, नावरे, पिचर्डे, पिंप्रीहाट, कोळगाव, लोणपिराचे, शिंदी, घुसर्डी, बात्सर, शिवणी यासह काही गावांतील सरपंच, महिला बचत गट सीआरपींमार्फत अ.भा. कार्ड, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले.

पुढे बोलतांना आमदार किशोर पाटील म्हणाले कि मी वाडे येथील श्रीराम मंदीराच्या बांधकामास २० लाखांचे सभामंडप देतो. तसेच कजगाव ते वाडे रस्तासाठी साडेचार करोड रुपये , मळगाव ते वाडे रस्तासाठी अडीच करोड रुपये , गोंडगाव ते वाडे रस्ता करुन पुन्हा रुंदीकरणाचे काम मंजुर केलेले आहे. भवानी शेरी रस्ता करुन उर्वरीत रस्ताही पुर्ण करु. तसेच तलाठी कार्यालयासाठी २५ लाख रुपये , पाणी पुरवठा योजनेसाठी ९३ लाख रुपये निधी मंजुर केलेला आहे. विज सबस्टेशनचे कामही लवकरच मार्गी लागणार आहे. नावरे ते गुढे गिरणा नदीवरचा १७ करोड रुपयांच्या निधीतुन पुलाचे बांधकाम सुरु आहे. भडगाव व पाचोरा मतदार संघात गिरणा नदीवर ६ पुलांच्या कामांसाठी १२० कोटी रुपये निधी मंजुर केलेले आहेत. प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असुन याकामी ५ करोड रुपये निधी मंजुर केला आहे.तसेच वाडे गावात शहिद जवान मनिषकुमार चौधरी या शहिद जवानाचा पुतळा उभारु. माञ ग्रामपंचायतीने जागा देउन कागदपञांसह पुर्तता करावी.असेही शेवटी आमदार किशोर पाटील यांनी विकास कामांची गाथा वाचतांना सांगीतले. तसेच हे सरकार पारदर्शक असुन राज्यात १ लाख तरुणांना भर्ती करुन नोकरीची संधी देणार आहे. असेही सांगीतले.

या कार्यक्रमास तहसिल विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, परीसरातील गावांचे सरपंच, महिला बचत गटाच्या सीआरपी, बचत गटांच्या महिला, महिला, नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्विततेसाठी परशुराम माळी, भुषण चित्ते,देविदास माळी, जालींदर चित्ते, मच्छींद्र शार्दुल, यांचेसह नागरीक, तसेच आयोजक किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था पाचोरा यांचे पदाधिकारी , लोकसेवा केंद्राचे अधिकारी, आदिंनी विशेष परीश्रम घेतले.

फोटो — वाडे येथे कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना आमदार किशोर पाटील, व्यासपिठावर उपस्थित मान्यवर.