वाडा । केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आज वाडा शहरामधे कांग्रेसच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या भाववाढीला पूर्णपणे विद्यमान भाजप सरकार जबाबदार असून ह्या भाववाढीने सर्वसामान्य माणूस बेजार झाला असून महागाईने सामान्यांचे जगणेही मुश्कील झाले आहे. राज्यात पेट्रोल व डीझलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी असताना खुप मोठ्या प्रमाणात टॅक्स लाऊन दर वाढविले. महाराष्ट्रात इंधनाचा भुर्दंड सरकार जनतेवर लावत आहे. महाराष्ट्र सरकारने विविध प्रकारचे सेस लावले आहेत त्यामुळे इंधनाच्या दरात अकरा रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरवाढीने अन्न-धन्य, दूध व इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटिला आला आहे. त्यामुळे सरकारने इंधनसुधा जीएसटी खाली आणून सर्वसामान्य लोकांना मदत करावी अशी मागणी ह्या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी केली.
तहसीलदार दिनेश कुर्हाडे यांना दिले निवेदन
वाडा येथील खण्डेश्वरी नाका येथून बैलगाडीसह निघलेली रॅली तहसिल कार्यालयापर्यंत नेऊन वाडा तहसीलदार दिनेश कुर्हाडे यांना निवेदन देण्यात आले. मोर्च्यामध्ये वाडा तालुका कांग्रेसचे अध्यक्ष दिलीप पाटील, ठाणे जिल्हा डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. विकास पाटील, प्रफुल पाटिल, शहराध्यक्ष राजू पातकर कुणबी सेनेचे कैलास पाटील, सचिन शिंगडा आदींसह शेकडो कांग्रेसचे कार्यकर्ते सामील झाले होते.