वाढते तापमान व औद्योगिकीरणाने नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास

0

अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांचे प्रतिपादन

राजगुरुनगर : औद्योगिकीकरण व वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत असून, पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन रोखणे हे आज सर्वात मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे प्रतिपादन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे -पाटील यांनी केले. गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘पर्यावरणावर होणार्‍या विविध घटकांचा परिणाम आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संस्थेचे संचालक कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, अ‍ॅड. माणिकराव पाटोळे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. तर या चर्चासत्रात सुमारे 65 संशोधक अभ्यासक सहभागी झाले होते.

तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन
पुण्याच्या मॉर्डन कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी पाणी प्रदूषणामुळे जलचरांवर झालेल्या परिणामांची माहिती दिली. प्रा. आर. एस. पंडित यांनी वाढत्या नियोजनशून्य औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाच्या झालेल्या र्‍हासाची कारणमीमांसा सांगितली. डॉ. सुधीर वाघ यांनी काही किटकांपासून पर्यावरणावर होणारे परिणाम सांगितले. डॉ. बबन टिळेकर यांनी वृक्षतोड, औद्योगिकीकरण, शहरीकरण यांच्या पर्यावरणावरील परिणामांची माहिती दिली. समन्वयक प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील यांनी मानवनिर्मित घटनांमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत चालला असून, निसर्गाचे संवर्धन करणे सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले.

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
यावेळी चर्चासत्रातील सहभागी अभ्यासक संशोधकांच्या शोधनिबंधाचा समावेश असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पोस्टर व मौखिक सादरीकरण स्पर्धेतील विजेते टी. जी. देवकर, जी. आर. बोर्‍हाडे, अपूर्वा भोसले व किरण पारधी, तसेच पी. एम. पवार, प्रतिभा बोंबले, एस. व्ही. गुंजाळ व एस. एस. मांजरे यांचा गौरव करण्यात आला.

चर्चासत्राचे आयोजन प्राचार्य डॉ.एस. बी. पाटील, प्रा. डी. एन. बिर्‍हाडे, प्रा. डी. एन. वालकोली, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. डी. एल. टाकळकर, एन. ए. नायकवडी, तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. चर्चासत्राचा समारोप संस्था संचालक बाळासाहेब सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. सूत्रसंचालन यज्ञेश सुंबरे व मधुरा वाघ यांनी केले, तर आभार गुर्बानी गुप्ता हिने मानले.