वाढत्या महागाईसह इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे मौन धरणे आंदोलन

0

केंद्रासह राज्य सरकारने साडेचार वर्षात केला जनतेचा विश्‍वासघात : प्रशासनाला निवेदन

भुसावळ- केंद्रासह राज्य सरकारने गेल्या साडेचार वर्षांच्या काळात जनतेचा विश्‍वासघात केला असून वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे शिवाय वाढतया इंधनाचे दराने जनजीवनावर परीणाम झाला असून सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राष्ट्रपिता गांधी जयंतीचे औचित्य साधून तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय मौनव्रत धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

विश्‍वासघातकी सरकारविरोधात या मागण्यांसाठी आंदोलन
पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरात होणारी तसेच महागाई वाढता आगडोंब, सरसकट कर्जमाफिला शासनाने दिलेला खो, कापूस उत्पादकांना आश्‍वासन देवूनही न मिळालेला सात हजारांचा भाव, पीक विम्यापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवल्याने तसेच अल्प पर्जन्यमान झाले असतानाही आणेवारी 50 पैशांवर लावल्याने व तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्याने तसेच पूर्ण वेळ व दाबाने वीजपुरवठा न मिळाल्याने, बोंडअळीचे नुकसान न मिळाल्याने तसेच अन्य विविध मागण्यांसाठी मौन व्रत धरणे आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
मौन धरणे आंदोलात जिल्हा परीषद सदस्य तथा तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष शे.पापा शेख कालू, वरणगाव नगरपालिकेचे गटनेते राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, दीपक मराठे, कैलास माळी, नीळकंठ चौधरी, ज्ञानेश्‍वर पाटील, नाना पाटील, युवराज पाटील, विलास रामदास पाटील, विलास जनार्दन पाटील, सुधाकर चौधरी, सागर दोडे, प्रवीण वळस्कर, प्रमोद उंबरकर, राजेश महाजन, पप्पू धनगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.