जळगाव । शहराचे वाढते विस्तारिकरण पाहता शहर हे चारही बाजूने वाढत आहे. म्हणजेच शहराचा विस्तार वाढ आहे. घरे, फ्लॅट, अपार्टमेंट यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या विस्तारिकरणामुळे महानगरपालिकेच्या महसूलात अधिक भर पडत आहे. जसे शैक्षणिक कर, वृक्ष कर, शौचालय कर, स्वच्छता कर आदी करांमुळे मनपाचा आथिक स्त्रोत वाढला आहे. मात्र या वाढत्या विस्तारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न महापालिकेसमोर येऊन ठेपला आहे.
प्रकल्प अनेक वर्षापासून बंद
कचर्याच्या विल्हेवाटीसाठी हंजीर प्रकल्प शहरातील आव्हाणे शिवारात सुरु केला. या कचर्यापासून खत निर्मितीचा हा प्रकल्प परंतु काही कारणास्त हा प्रकल्प अनेक वर्षापासून बंद स्थितीत असल्याने शहरात जमा होणारा रोजचा हजारो टन कचरा त्याच हंजीर प्रकल्पाजवळी डंपींग ग्राऊंडवर टाकण्यात येत आहे. शहराचा वाढता विस्तार बघता हंजीर प्रकल्पापर्यंत म्हणजेच निमखेडी शिवारापर्यंत अपार्टमेंट, घरे झालेली आहेत. तसेच मेहरूण परिसरातील तांबापुरा भागातही हा कचरा टाकण्यात येत आहे.
परिसरातील नागरिकांना आजारांची लागण
दरम्यान, तांबापूर, मेहरूण व या हंजीर प्रकल्पाजवळी जमा होणार्या या कचर्याला आग लावली जाते. या आग लावल्यामुळे परिसरात दोन तीन कि.मि. परिसरात ही दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांना खोकला, डोकेदुखी सारखे अनेक आजारांना सामोरे जावे लगत आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी देऊनही या कचर्याचा प्रश्न सुटत नसल्याचे दिसून येत आहे. तरी जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील जमा होणारा कचर्याची विल्हेवाट लावावी जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, असे नागरिकांतून बोलले जात आहे. शहरातील अनेक भागात आज मोठ्या प्रमाणार कचरा व घाण साचला असून महापालिका कर्मचारी दाने दिवसांऐवजी पाच ते सहा दिवसानंतर उचलविण्यासाठी येत असल्याचे परीसरातील नागरीकांकडून बोलले जात आहे.