वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

0

जामनेर: कोरोना विषाणू ने देशासह महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन ची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान मदत कक्षात मदतीचे आवाहन केले आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता कक्षात मदत करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री कक्षात जामनेर येथील शंकर नगर, हिवरखेडा रोड येथील रहिवाशी प्रमोद वाघ यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा न करता, वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता कक्षात 2100 रुपयांची मदत केली.तहसीलदार अरुण शेवाळे यांना प्रमोद वाघ यांचा मुलगा सार्थकच्या हस्ते नुकताच धनादेश देण्यात आला.