रावेर- रावेर पंचायत समितीच्या वाढीव उपकर निधी (सेस फंडा) अपहार झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होताना दिसत आहे. प्रशासन निधी खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने संशय वाढला आहे. प्रशासनाकडून संबधित पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या गणात खर्च करण्यासाठी सुमारे पोने तीन लाख वाढीव उपकर निधी (सेस फंडाच्या) माध्यमातून देण्यात आले होते तर काही सदस्यांनी हा निधी कागदोपत्री दाखवून जुन्या कामावर खर्च करून नवीन कामे दाखविले आहे. काहींनी खड्डे बुजवण्यावर हा निधी खर्च केला असून त्यात रावेर पंचायत समिती सेस फंडाची माहिती देण्यास आधीच दिरंगाई दाखवत असताना निधीत गौडबंगाल झाल्याबाबत ‘दैनिक जनशक्ती’त वृत्त प्रसिध्द होताच काही सदस्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे. हा निधी कोणत्या गणात कशा पद्धत्तीने खर्च झाला हे मात्र कागदपत्रे समोर आल्यानंतर कळणार आहे.