एरंडोल । शासनाने कर व दंडात केलेल्या अन्यायकारक वाढी बद्दल 24 जानेवारी 2017 रोजी एरंडोल प्रांत अधिकारी विक्रम बांदल यांना शहरातील रिक्षाचालक व मालक यांनी निवेदन देण्यात आले. दंड व वाढीव कर कमी न केल्यास अन्यथा वाहन चालक व मालकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संघाचे अध्यक्ष संदीप जैन, सचिव शशिकांत पाटील, सुदर्शन देशमुख, सुनील महाजन, अतुल पाटील, सुनील जगताप, धनराज जाधव, जगदीश महाजन, प्रवीण पाटील, संतोष जगताप, शेख हकीम, इक्बाल मुजावर, संदेश चौधरी, शेअरली सैयद, योगेश परदेशी, राहुल महाजन, के.डी.पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
तिव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा
या निवेदनात नवीन वर्षा पासून शासनाने आटो रिक्षा, आपेरिक्षा, मिनीडोर, काली-पिली व आदि खाजगी प्रवाशी वाहतूक करणार्या वाहनांन संदर्भात विविध करांमध्ये व दंडामध्ये अन्यायकारक वाढ केल्याने आज त्याप्रमाणे व्यवसाय होत नसून येवढ्या प्रमाणात कर व दंड भारणे शक्य नाही. आजच्या तरुणांना नोकरी नाही. काम धंदा नाही. म्हणुन बँक व फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून सदर व्यवसाय सुरु केला असता त्यास शासनाने केलेल्या कर व दंडात अन्यायकारक वाढीमुळे आमचा व्यवसाय अडचणीत आला आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे येणार्या काळात बेरोजगारी व गुन्हेगारी वाढेल याचा विचार करून शासनाने केलेली अन्यायकारक कर व दंड वाढ त्वरित मागे घ्यावा अन्यथा आम्ही सर्व वाहनचालक, मालक संघटना तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.