वाणिज्य विभागासह रेल्वे सुरक्षा बल व ऑपरेटींग विभागाला जीएम शिल्ड प्रदान

0

कर्मचार्‍यांचे काम समाधानकारक ; डीआरएम आर.के.यादव यांनी केला कर्मचार्‍यांचा गौरव

भुसावळ:- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने या विभागाला यंदा मध्य रेल्वेतर्फे तब्बल चार ढाली (जीएम शिल्ड) मिळाले होते. गतवर्षाच्या तुलनेत यंदा दोन शील्ड मिळाल्याने भुसावळ विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता. 5 एप्रिल रोजी मुंबई मुख्यालयात मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक (जीएम) डी.के.शर्मा यांनी त्याबाबत घोषणा केल्यानंतर नागपूरात 12 एप्रिल रोजी पुरस्कारांचे वितरण जीएम शर्मा यांच्या हस्ते झाले होते. भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी शिल्ड स्वीकारल्यानंतर सोमवारी या शिल्ड त्या-त्या विभागाला यादव यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. वाणिज्य विभागाला दोन तर रेल्वे सुरक्षा बलासह ऑपरेटींग विभागाला प्रत्येक एक शिल्ड प्रदान करण्यात आल्यानंतर कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी डीआरएम यांनी कर्मचार्‍यांचे काम समाधानकारक असल्याचा गौरव करीत अशाच पद्धत्तीने भुसावळ विभागाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास एडीआरएम मनोज सिंग, सिनी.डीसीएम सुनील मिश्रा, सिनी.डीपीओ डॉ.तुषाबा शिंदे, सिनी.डीओएम नरपत सिंग, सिनी.डीएससी अजयकुमार दुबे, सिनी.डीईनको भंगाळे, सिनी.डीएफएम विजय कदम, सिनी.डीईई अग्रवाल आदींसह रेल्वेच्या विविध विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.