वातानुकुलीत किंगकाँग बसेस बंद होणार!

0

मुंबई : बेस्ट उपक्रमाचे सर्वाधीक नुकसान किंगकाँग वातानुकूलित बसेसमुळे झाले असल्याने हा पांढरा हत्ती पोसण्यापेक्षा या बसेस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मात्र या बसेस पडून असल्याने आणि या बस अजून आठ वर्ष वापरण्याची संधी उपलब्ध असल्याने सदर बसेस मध्ये काही दुरुस्त्या करून बिगर वातानुकूलित बसमध्ये परिवर्तन करून चालविण्यात येतील असे सूचक वक्त्यव्य बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी केले आहे. सध्या बेस्ट उपक्रमाकडे 250 किंगकाँग वातानुकूलित बस पडून आहेत. या बस वापरात नसल्याने या बसेसची दुराव्यास्था वाढत आहे.

एका बसचे आयुष्य 15 वर्ष असते ते पाहता अजून आठ वर्ष या बसेस रस्त्यावर धावू शकतात याचा विचार करून आणि सदर बसचे चेसिस, गिअर बॉक्स उत्तम प्रतीचे असल्याने या बसच्या बोड्या बदलून बिगर वातानुकूलित बसेस म्ह्णून वापरात आणण्याचा विचार करीत असल्याचे कोकीळ यांनी सांगितले. सध्या नवीन बस खरेदीसाठी किमान 51 लाख रुपये खर्च येत असून हे पाहता किंगकाँग बसची बॉडी बदलण्यासाठी एका बसला केवळ पाच लाख खर्च येणार आहे. याचा विचर करता एका बसेसच्या किमतीत बेस्टला 10 बसेस उपलब्ध होऊ शकतील असे सुहास सामंत यांनी सांगितले.