वातावरणातील बदलामुळे शहरात रुग्णसंख्येत झाली वाढ

0

भुसावळ। वातावरणात झालेल्या बदलामुळे व्हायरल आजारांचे रुग्ण वाढले आहेत. विषम वातावरणामुळे शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना व्हायरल आजारांची लागण होत आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.

मध्यंतरी पाऊस आणि गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा वातावरणातील उष्णता वाढली आहे. यामुळे विषम वातावरणाची निर्मिती झाली. यामुळे सर्दी, ताप, अंगदूखी आदी आजारांची लागण होण्याचे प्रकार वाढले आहे. यासह काविळ, डेंग्यू आदींचेही रुग्ण अधिक आहेत. बदललेले वातावरण बालकांना सहन होत नसल्याने बालरुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे शहरातील खासगी बालरोगतज्ज्ञांचे दवाखाने गर्दीने फुलले आहेत. पालिका रुग्णालयातील ओपीडी वाढली असून येत्या पंधरवड्यापर्यंत व्हायरल आजार बळावण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळयात पाणी गाळून शुध्द करुन प्यावे, डासांचा उपद्रव थांबविण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवून कोरडा दिवस पाळावा.