जळगाव। सुरत लाईनवरील मालधक्क्यावर काम करत असताना विजेचा धक्का लागून मृत झालेला रेल्वेचा वायरमन मनोज बापुराव पाटील या तरुणावर अंत्यसंस्कार करताना एका कर्मचार्याकडून वादग्रत विधान झाल्याने मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता नेरी नाका येथील वैकुंठधाम येथे वाद निर्माण झाल्याचा प्रकार घडला. परंतू रेल्वेच्या अधिकार्यांनी मयताच्या वडीलांची समजूत घातल्यानंतर अंत्यसंस्कार झाले.
अधिकार्यांनी घातली नातेवाईकांची समजूत
मनोज पाटील यांचा मृत्यू रेल्वे विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पाण्यात काम करत असताना सुरक्षेसाठी असलेले साहित्य मनोजला पुरविण्यात आले नव्हते, शिवाय तीन वरिष्ठ वायरमन असताना नवख्या वायरमनकडून हे काम करवून घेतले जात होते. असे असताना अंत्यसंस्काराच्यावेळी विद्युत विभागातील एका कर्मचार्याने मनोज हा ड्युटीवर नव्हता. त्याची ड्युटी संपलेली होती, असे वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. असे वादग्रस्त विधान केलेच कसे असा जाब विचारण्यासाठी नातेवाईक व भारिप बहुजन संघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता. त्यामुळे सरपणावर ठेवलेले प्रेत सोडून सर्व जण त्या कर्मचार्यावर संताप व्यक्त करीत होते. यावेळी अरविंद कुमार या अधिकार्याने मनोज पाटील यांच्या वडीलांची समजूत घातली, त्यानंतर अग्निडाग देण्यात आला. दरम्यान, मनोजच्या मृत्यूबाबत हलगर्जीपणा करणाजयावर कारवाई करावी या मागणीसाठी भारिप बहुजन संघातर्फे भुसावळ येथील डीआरएम यांनी निवेदन देणार असल्याचे महानगराध्यक्ष जहूर बिसमिल्ला खाटीक व महानगर सचिव उमेश भंगाळे यांनी सांगितले.