वादविवाद विसरून सुनील आणि कपिल येणार एकत्र ?

0

मुंबई : कॉमेडीचे महारथी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. वादानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्यानंतर कपिलचा वाईट काळ सुरू झाला. कपिलने बऱ्याचदा वाद विसरून सुनीलशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. अखेर वर्षभराच्या वादावादीनंतर सुनील आणि कपिल पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

सुनीलचा महिन्याभरापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण फक्त आठ आठवड्यांसाठीच त्याने हा शो साइन केला होता. ‘माझ्या हातात जितका वेळ होता, तितकाच वेळ मी या शो ला देऊ शकलो. ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे हा वेळ मी सत्कारणी लावला,’ असं त्याने म्हटलं होतं. सुनीलसाठी माझ्या शोचे दार नेहमीच खुले असल्याचं कपिलने आधीच स्पष्ट केलं होतं.