पिंपळनेर । येथील कर्म.आ. मा. पाटील व कै. अण्णासो एन.के. पाटील विज्ञान महाविद्यालयाच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकावले. संस्थेचे संस्थापक कर्म. आनंदराव माणिकराव पाटील उर्फ बंडू बापूजी यांच्या स्मरणार्थ आयोजित वादविवाद स्पर्धेंत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रु 2500/- , प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह किर्ती कालिदास कुवर हिला मिळाले. तर किर्ती कुवर व रविराज एखंडे यांच्या संघास विजेतेपदाचा सांघिक चषक माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
यांनी केले अभिनंदन
तसेच नवापूर महाविद्यालयात आयोजित वादविवाद स्पर्धेंत याच संघाने द्वितीय क्रमांचे पारितोषिक पटकावले. संघ व्यवस्थापक प्रा.डॉ. राम पेटारे व प्रा.डॉ. आनंद खरात हे होते. त्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.टी. सोनवणे, संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.