32 कोटींच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरु आहे. या पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे, डॉक्टरांच्या निवास्थानाचे नुतणीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 32 कोटी तीन लाख 85 हजार रुपये खर्च येणार आहे. हे काम ठेकेदार एस.एस.साठे यांच्याकडून करुन घेण्यास स्थायी समितीने शुक्रवारी मान्यता दिली. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यासाठी पदव्युत्तर मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासाठी विविध 43 पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक विषयांसाठी प्रत्येकी एक प्राध्यापक असणार आहे. तर, विविध विषयांचे 26 सहयोगी प्राध्यापक देखील नेमले जातील. तसेच, कोडींग क्लर्क, आक्युपेशनल थेरीपेस्ट, डॉक्युमेंटलिस्ट, स्टँस्टिशियन कम असिस्टंट प्रोफेसर, प्रोथेस्टिक अॅण्ड आर्थोटीक टेक्रीशियन या पदावरही प्रत्येक एक जण भरती केला जाणार आहे.
हे देखील वाचा
डॉक्टरांचे निवास्थानाचे नुतणीकरण
पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे, डॉक्टरांचे निवास्थानाचे नुतणीकरण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. निविदेची रक्कम 30 कोटी 47 लाख 53 हजार 224 रुपये निविदेची रक्कम होती. त्यासाठी ठेकेदार एस.एस.साठे यांची 30 कोटी 66 लाख 71 हजार 616 रुपयांपेक्षा 4.50 टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली. एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा योग्य दरापेक्षा 9.81 ने टक्के कमी येत आहे. त्यामुळे मंजूर दरानेच म्हणजेच 31 कोटी 84 लाख 67 हजार 119 रुपयांची प्राप्त निविदा स्वीकारण्यात आली. रॉयल्टी चार्जेस, मटेरियल टेस्टींग चार्जेस असे दोन कोटी वाढीव रकमेस एकूण 32 कोटी तीन लाख 85 हजार 510 रुपयांमध्ये हे काम करुन घेण्यात येणार आहे. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली.