वायसीएम रुग्णालयात वैधता संपलेली औषधे

0
पिंपरी : वैधता संपलेल्या औषधांची व वापरलेल्या सुयांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना, वायसीएम रुग्णालयातील अँटी रिट्रोव्हायरस थेरपी सेंटरमध्ये (एआरटी) 2010 पासून वैधता संपलेली औषधे व वापरलेल्या सुया आढळून आल्या आहेत. या एआरटी सेंटरमध्ये शहर, उपनगरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. विविध तपासण्या केल्यानंतर वापरलेल्या सुया निर्जंतुक करून त्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये त्या भरून ठेवलेल्या आहेत. असे सुमारे 17 कॅन व 2010 मध्ये वैधता संपलेल्या औषधांचे सात बॉक्स आढळून आले आहेत. याबाबत ‘एआरटी’ सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मेढे यांना विचारले असता,’वरच्या बाजूला हे कॅन ठेवलेले होते. सेंटरच्या नूतनीकरणाचे काम करताना ते दिसून आले. त्याची तत्काळ विल्हेवाट लावणार आहोत, असे त्यांनी सांगितले.