भुसावळ। रेल्वेत प्रवाशांकडून अनाधिकृतपणे तिकीट तपासणी करीत असताना तोतया तिकीट निरीक्षकाला बुधवार 10 रोजी कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. याबाबत भुसावळ रेल्वे लोहमार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
19 हजारांची रोकड हस्तगत
याप्रकरणी मनमाड रेल्वे स्थानकाजवळ गाडी क्रमांक 22167 लोकमान्य टिळक वाराणसी एक्सप्रेस गाडीच्या बोगी क्रमांक एस.7 मध्ये सकाळी 8 वाजेच्या सुमारास आशिष प्रकाश यादव (वय 25, रा. बल्लीपूर, तालुका मडीयाहू, जिल्हा जौनपूर) हा प्रवाशांकडून अनाधिकृतपणे तिकीट तपासणी करीत असताना तिकीट निरीक्षक अनिल मारोती खर्चे यांनी या तोतया टिसीची तपासणी केली असता सदर व्यक्ती हा तोतया टिसी असल्याचे उघडकीस आले. खर्चे यांनी हि बाब रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीसांना सांगितल्यानंतर यादव यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान रेल्वे पोलीसांनी त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडून 19 हजार रुपयांची रोकड आढळून आली असून ती ताब्यात घेण्यात आली.