उल्हासनगर । केंद्रीय विद्यालय अंबरनाथमध्ये वार्षिक क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या क्रीडा दिवसासाठी मुख्य अतिथि म्हणून केंद्रीय विद्यालय संघठन मुंबई विभागाच्या उपायुक्त अरुणा पी. भल्ला व विशेष अतिथि म्हणून अंबरनाथ विधानसभेचे आमदार बालाजी किणीकर उपस्थित होते. स्काउट अँंड गाइडच्या विद्यार्थ्यांनी अतिथींना सलामी दिली, तर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन व लेेजीम पथकाने नृत्याने स्वागत केले. प्राचार्य दीपक सिंघ भाटी सरांनी सर्वांचे स्वागत करत विद्यालयाच्या वार्षिक खेळाविषयी व शैक्षणिकविषयी माहिती दिली.
खेळाविषयी घेतली शपथ
गणेश वंदनेनंतर खेळाची सुरुवात परेडने झाली. परेड झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी खेळाविषयीच्या भावनेची शपथ घेतली. मुख्य अतिथी यांनी प्रज्वलित केलेली मशाल संपूर्ण मैदानमध्ये फिरवण्यात आली. विद्यालयातील वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांनी 100 मीटर रनिंग, गोनी रनिंग अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेतला, दोनही सन्मानित अतिथींनी मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांना पुरस्कृत केले. अतिथीनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत उत्साह वाढवला, अतिथीनी विद्यालयातील वार्षिक क्रीडा दिवसाची व अन्य विषयाची विचारपूस करून प्रशंसा केली. या कार्यक्रमामध्ये आयुध निर्माणी अंबरनाथ ग्राउंड प्रभारी दीपक जगदाले. डॉ. देव राज पाल व इतर सन्मानित व्यक्ती उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता मुख्याध्यापक पी. आर. एस. चौहान यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून व्यक्त केले.