वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

0

नवापूर : नवापूर वनवासी उत्कर्ष समिती प्राथमिक शाळा येथे वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेचे  उद्घाटन मुंकुद निकम यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी न.पा.आरोग्य सभापती अजय पाटील,राजेंद्र साळुखे, डॉ.मनोज चव्हाण, मुख्याध्यापक सोनज भांडारकर, प्रकाश चौधरी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात ९० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  एका गाण्यात एकाच वेळी ५० विद्यार्थ्यांच्या समुहनृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रम यशस्वी करण्यसाठी शाळेतील  सागर पाटील, मनोहर चव्हाण, करण वसावे, रोहीनी निकम, रोहीनी देसले, मनिषा बागले, ममता गावीत, दिपक मराठे यांनी परीश्रम घेतले.