धानोरा : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे सातपुडा शिक्षण संस्था भुसावल, संचलित झि.तो. माध्यामिक विद्यालय व ना.भा ज्युनियर कॉलेज येथे कलारंजन वार्षिक स्नेहसंमेलन 2017 या सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 29 कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. यात 200 ते 250 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. नाटकातून सामाजिक विषयावर प्रकाश टाकण्यात आले होते. लावणी, देशभक्तिपर गिते, शेतकरी आत्महत्यावर सादरीकरण करण्यात आले. स्टेट डान्स, रिमिक्स डान्स, अहिराणी गाणे, मराठी गाणी, झाशिची राणी, यळकोट यळकोट जय मल्हार, सुया घे पोत नाटिका व गीत लोकनाट्य खूपच गाजले, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकारांना टाळ्यांच्या गजरात दात दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखदेराव पाटील होते.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकजयपाल हिरे होते. बी.एस. महाजन, चुडामण पाटील, वामन महाजन, प्रदीप महाजन, बाजीराव पाटील, नामदेव पाटील, कल्पना पाटील, किर्ती पाटील, माणिकचंद .महाजन, अनिल महाजन, किरण पाटील, पंकज चौधरी, आरिफ पिंज्जारी, नवल गुजर, पुनम पाटील, बी.डी.पाटील, पर्यवेक्षक ए.एम.पाटील, के.के.एन.जमादार प्राचार्य रेखा महाजन, डिगांबर सोनवणे, सुनिल महाजन, एम.सी.बडगुजर आदी उपस्थित होते.