नगरपालिका राबवित आहे स्वच्छता अभियान मात्र अनेक भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष
शिरपूर । वाल्मिकनगर जवळील जिनच्या मोकळ्या जागेची स्वच्छता करण्यासंदर्भात नगराध्यक्षा पटेल यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख भरत राजपूत, हिंमतराव महाजन, छोटूसिंग राजपूत, राजू टेलर, मनोज धनगर, राजेश गुजर, दिपक मराठे, योगेश ठाकर, बंटी लांडगे, कुणाल शेटे, मसुद शेख आदी उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शिरपूर शहरात नगरपालिकेमार्फत स्वच्छता अभियान सुरू आहे. नगरपालिकेचे उपक्रम स्वागतार्ह आहे मात्र शहरातील काही भागात घाण साचलेली आहे. त्यामुळे त्या भागाकडे स्वच्छता अभियान टिम अजूनही पोहचलेली नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली आहे.
अस्वच्छतेबाबत शिवसेनेतर्फे नगराध्यक्षांना निवेदन
आरोग्यास धोका
वाल्मिकनगरच्या बाजूला असलेल्या जिमच्या मोकळ्या जागेत अक्षरश: डंपींग ग्राऊंड सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कचर्यासोबत पाण्याचे डबके साचलेले आहेत. सध्या पावसाळा सुरू असल्याने डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू यासारखे आजाराची साथ सुरु आहे. अस्वच्छतेमुळे या आजारांनी खतपाणी खातली जात असल्याची स्थिती आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन स्वच्छता करावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
साथीचे रोग पसरले
अस्वच्छता पसरल्याने या भागात साथ रोगांचा फैलाव झालेला आहे. अस्वच्छता पसरलेल्या भागात राहणारे सर्व नागरिक हे हातमजूरी करणारे असल्याने त्यांच्यापूढे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा आहे. मात्र त्या आजाराचा पुढे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. गेल्या काळात शिरपूर शहरात एक रूग्ण स्वाईन फ्ल्यूचा आढळून आला होता, त्याच्यावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत. ही बाब शिरपूर शहरातील नागरिकांसाठी गंभीर स्वरूपाची आहे.
मनपाने लक्ष द्यावे
स्वच्छतेबाबत त्वरीत लक्ष घालून व जीनच्या संपूर्ण भागाला कंपाऊंड केले जावून घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तरी आपणास शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे कळविण्यात येते की, वरील बाबींचा विचार करून शिरपूर शहरात जेथे जेथे घाणीचे साम्राज्य असेल तेथे त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी व नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.