वाल्हेकरवाडीत आजपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू

0
खाचणे परिवारातर्फे शेवंतीबन कॉलनीत आयोजन
पिंपरी-चिंचवड :  वाल्हेकरवाडी शेवंतीबन कॉलनीतील (चिंतामणी चौक) केशराज व्हिला येथे शुक्रवारपासून (15 जून) अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ होत आहे. कुमुदिनी खाचणे व प्रेमचंद खाचणे यांच्या स्मरणार्थ याचे आयोजन केले आहे. यासाठी परिसरातील भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक किसन राजाराम खाचणे, तुषार किसन खाचणे, स्मिता तुषार खाचणे यांनी केले आहे. भागवत कथेतील प्रसंगानुरुप देखावे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सागितले.
कार्यक्रमाची रुपरेखा
दैनंदिन कार्यक्रम पहाटे 5 ते 7 या वेळेत काकड आरती, प्रार्थना व पसायदान, सकाळी 7 ते 8 श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, सकाळी 9 ते दुपारी 1 श्रीमद्भगवत कथा, सायंकाळी 4 ते 5 हरिपाठ रात्री 8 ते 10 या वेळेत कीर्तन होईल. शुक्रवारी (दि. 15) हभप दिनकर महाराज कडगांवकर, शनिवार 16 जून रोजी हभप देविदास महाराज भादलीकर, रविवार, 17 जून रोजी हभप डालेंद्र महाराज आळंदीकर, सोमवार, 18 जून रोजी हभप नरहरी महाराज आळंदीकर, मंगळवार 19 जून रोजी हभप मनोज महाराज ओढरखेडकर, बुधवार 20 जून रोजी हभप तुळसीदास महाराज नांंदेडकर, गुरुवार 21 जून रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत भव्य दिंडी सोहळा, भारुडे व ताकीदपत्र, शुक्रवार 22 जून रोजी श्री क्षेत्र कुंडलेश्‍वर येथील हभप भरत महाराज यांचे  सकाळी 9 ते 11 या वेळेत काल्याचे कीर्तन होणार आहे.