वाळूची अवैध वाहतूक : शहर पोलिसांनी ट्रॅक्टर केले जप्त

जळगाव : शहरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर शहर पोलिसांनी जप्त करीत गुन्हा दाखल केला.

केसी पार्क परीसरात कारवाई
जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने शनिवारी पहाटे केसी पार्क परीसरातून एका ट्रॅक्टरवर कारवाई केली. ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याने पोलिस नाईक राजकुमार चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील चालक नवदीप कैलास पाटील (22, चंदू आण्णा नगर, जळगाव) व ट्रॅक्टर मालक जितेंद्र प्रकाश कोळी (27, निमखेडी, ता.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहेत.