वाळूच्या टीप्परने उडवल्याने भोलाणेचा युवक ठार

0

नशिराबादजवळ अपघात ; टीप्पर चालक पसार

भुसावळ- भरधाव वाळू वाहतूक करणार्‍या टीप्परने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना नशिराबादजवळ प्लायओव्हरजवळ बुधवारी सायंकाळी 6.10 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार विजय अण्णा कोळी (23, रा.भोलाणे, ता.जळगाव) हा ठार झाला तर अज्ञात टीप्पर चालक पसार झाला. दुचाकी (एम.एच.19 बी.सी. 555) ने जात असलेल्या विजय कोळी यांना टीप्पर (क्रमांक एम.एच.19 झेड.9997) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कोळी यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. अज्ञात टीप्पर चालकाविरुद्ध पोलीस नाईक गुलाब माळी यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.