वाळूतस्करांच्या दोन बोटी स्फोटांनी उडविल्या

0

नवापूर। नवापूर तालुक्यातील सरफणी नदीच्या वाळूपट्ट्याचा ठेका जारी झालेला नसतानाही जहाज, डंपर, ट्रक, ट्रँक्टरने वाळु काढण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु होते.प्रांतधिकारी निमा अरोरा यांना गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने करंजवेलगतच्या उकाईच्या फुगवटयात व सरफणी-उकाईच्या फुगवटयात व सरफणी नदीपात्रात छापा टाकला होता सात वाळु काढण्याच्या मशिनींसह दोन बोटी जप्त केल्या होत्या. आज करंजीवेल गावाजवळ दोन लोखंडी बोटी स्फोटात नष्ट करण्यात आल्या.

लोखंडी बोटींसह यंत्र सामग्री नेस्तनाबूत
प्रांतधिकारी निमा अरोरा यांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार तहसीलदार प्रमोद वसावे पोलिस निरीक्षक रामदास पाटील सहायक पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या पथकाने करंजवेलगत उकाईच्या फुगवटयात व सरफणी -उकाईच्या फुगवटयात व सरफणी नदीपात्रात छापा टाकला होता सात मशिनींसह दोन बोटी जप्त केल्या होत्या. पंरतु आज करंजीवेल गावाजवळ दोन लोखंडी बोटी जिलेटीन स्फोटके लाऊन नष्ट करण्यात आल्या.

मासेमारांना अंतरावर थांबवले
तहसीलदार प्रमोद वसावे, बी एस पावरा.जी एस कोकणी, मिंलिद निकम, दिलीप कुलकर्णी, डी जे साळुखे, विनायक गावीत, झेड के गायकवाड, प्रितम वसावे, अलताफ शेख, नवनाथ चौधरी, बाळासाहेब सुर्यवंशी, नरेंद्र नाईक.आदीनाथ गोसावी, जितेंद्र तोरवणे, देविदास सुर्यवंशी, निलेश दहिफळे उपस्थित होते या बोटी नष्ट करताना मासेमारांना पोलिसांनी 1 कि.लो मिटर दुर जाण्याचे सांगितले.