जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई होणार ?
हिंगोणे ता.चाळीसगाव — येथील हिंगोणे सिम येथील गावाजवळच्या नदी पात्रात भल्या पहाटे तीन वाजता सरपंच ज्ञानेश्वर महाजन व गावकऱ्यांनी मिळून वाळू उपसा करणाऱ्या एक जेसिबी ने डपर भरले जात असताना पकडल्याने खळबळ उडाली आहे.
आजमितीस कोट्यवधी रुपयांची वाळू संबधित वाळूचोरांना उपसा केल्याचे घटनास्थळी दिसून येत आहे गावाजवळ असलेल्या बांधाऱ्या जवळ गेल्या वर्ष भरा पासून ही वाळू माफिया कडून वाळू उपसा सुरू असून परंतु वाळू माफियांच्या दहशतीमुळे आम्ही गप्प बसलो होतो अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही त्यामुळे आम्ही पाळत ठेवली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गावकऱ्यांनी तहसीलदार कैलास देवरे यांना ही माहिती दिली घटनास्थळावर तहसीलदार यांनी पंचनामा सुरू केला असून इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाल्याचे बघून ते सुद्धा अवाक झाले होते गावकऱ्यांनी सदर वाळू माफियावर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे जिल्ह्यात या वर्षाची वाळू चोरी सर्वात मोठी घटना असल्याचे उघडकीस आले आहे
Next Post