वाळू माफियांविरोधात शिवसेनेचा यल्गार

0

मुक्ताईनगर तालुक्यात वाळूचा उपसा न थांबल्यास तीव्र आंदोलन

मुक्ताईनगर: तालुक्यातील कुर्‍हा भागातील थेरोडा, रिगाव, बोदवड, कोरहळे यासह अन्य ठिकाणी स्थानिक पक्षांच्या विशिष्ट वाळू माफियांद्वारे मोठ-मोठ्या पंपाद्वारे अवैधरीत्या रोज हजारो ब्रास वाळू उपसा केली जात आहे. या संदर्भात महसूल प्रशासनाचे वाळू माफियांना अर्थपूर्ण सहकार्य असल्याने वाळू माफियांवर वचक नसल्याने शिवसेना आक्रमक होऊन तत्काळ दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे दिलेला आहे.

सेनेच्या तक्रारींना केराची टेापली
कुर्‍हा भागातील थेरोळा, रिगाव, बोदवड, कोऱहाळे यांसह बऱयाच ठिकाणी स्थानिक राजकीय पक्षांचे विशिष्ट वाळूमाफिया पंपाद्वारे अवैधरीत्या दररोज हजारो ब्रास वाळू उपसा करीत आहेत. या संदर्भात शिवसेनेने प्रशासनाकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनदेखील याबाबत महसूल प्रशासन कोणत्याही वाळू माफियांवर कारवाई करत नसून फक्त देखाव्यापुरता किरकोळ वाहनांवर कारवाई केली जात आहे परंतु वाहनांद्वारे केल्या जाणार्‍या वाळूच्या उगम स्थानाकडे मात्र जाणीवपूर्वक अर्थ संबंधाने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिवसेनेने केलेला आहे. तसेच या सर्व अपहार व शासनाचा महसूल खाण्या मागे कुर्‍हा तलाठी सरोदे आस्वतः भागीदार असल्याचा आरोप शिवसेनेने निवेदनाद्वारे केला आहे. अशा पद्धतीने गौण खनिजाची अवैधरीत्या लूट करून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. या सर्व वाळू माफियांवर त्वरीत कारवाई होऊन सर्व वाळू अवैद्य उपशाची साधने जप्त करण्यात यावी अन्यथा शिवसेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचे ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे .निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, अ‍ॅड.मनोहर खैरनार, सुनील पाटील, अमर पाटील, बना पाटील,अमोल पाटील, प्रवीण चौधरी, शुभम तळेले, प्रफुल्ल पाटील, शुभम शर्मा, आनंदा ठाकरे, शुभम कपले, चेतन पाटील व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.