वावरिंका अजिंक्य

0

जिनिव्हा । स्वित्झर्लंडच्या तृतीय मानांकित स्टॅनिसलास वावरिंकाने शनिवारी येथे जिनिव्हा खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. अंतिम सामन्यात वावरिंकाने जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव करत जेतेपद पुन्हा स्वत:कडे राखले. वावरिंकाने 2015 साली फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती.