रेशन दुकानदाराला मारहाणीचा निषेध

0

चाळीसगाव । वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे आधार कार्ड लिंक करण्यासाठी आधार कार्ड मागितल्याचा राग येवुन रेशन दुकानदार व त्यांच्या पत्नी, मुलीला मारहाण करुन त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करणार्‍या आरोपीवर कारवाई करावी यासाठी दिनांक 15 रोजी चाळीसगाव तालुका स्वस्त धान्य दुकान परवाना धारक व किरकोळ केरोसीन विक्री संघटनेच्या वतीने तहसिलदार चाळीसगाव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटना अध्यक्ष जगदीश चौधरी, उपाध्यक्ष ए.ए.मुल्ला, सचिव गणेश निकुंभ, दुकानदार आर.डी.चौधरी, ई.डी.बोरसे, आर.जी.भावसार, पी.बी.गादीया, पी.जे.पवार, पी.सी.खरटमल, आर.व्ही.राठोड आदी रेशन दुकानदार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.