वासुदेव इंगळे 22 पर्यंत न्यायालयीन कोठडीत

0

भुसावळ- शहरातील श्री संतोषी माता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव इंगळे यांनी बनावट 101 चा दाखला बनवल्याने त्यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होता तर इंगळे यांच्यासह वसुली अधिकारी प्रशांत भारंबे यांना अटक करण्यात आली होती. आरोपींना 9 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची 22 पर्यत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. इंगळे यांनी केलेल्या जामीन अर्जासाठी न्यायालयाने पोलिसांकडून त्यांचा अहवाल मागविला असून सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे पोलिस त्यांचे म्हणणे न्यायालयास सादर करणार आहे.