वाहतुकीची समस्या रोजचीच

0

चिंचवड : चापेकर चौकातील वाहतूक समस्या ही नेहमीचीच बाब झाली आहे. मात्र, त्यावर उपाययोजना शोधण्यास महापालिका प्रशासन कमी पडत आहे. त्यामुळे वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्य नागरीकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. चौकात चिंचवडगावातून चार रस्ते, चिंचवड स्टेशन, आदित्य बिर्ला हॉस्पिटल व एसकेएफ कंपनीकडून प्रत्येकी एक रस्ता, असे एकूण सात रस्ते एकत्र येतात. जवळच भाजी मंडई आहे. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी चौकातच उड्डाणपूल उभारण्यात आला. परंतु, वाहतूकीची समस्या अधिकच जटील होत चालली आहे. याकडे महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वाहतूक पोलीस गंभीरपणे पहातच नाहीत. ही वाहतूक समस्या सोडविण्यासाठी विविध स्वयंसेवी, सामाजिक संस्था, नागरीकांनी पर्याय शोधावेत, अशी मागणी ज्येष्ठ नागरीक रमेश रामकृष्ण देव यांनी केली आहे.