चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरूळीफाटा ते चिंबळीफाटापर्यंत नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील ग्रामस्थ, नागरिक हैराण झाले आहेत. खेड तालुक्यात दक्षिण भागातील चाकण परिसरात निघोजे, महाळुंगे, कुरूळी, चिंबळी, मोई व मोशी परिसरात गेल्या दहा वर्षापुर्वी मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे.
त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात कंपन्या तसेच गोदामे उभारली गेली आहेत. मालमाहू गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण भोसरी रत्सावर आळंदी फाटा, कुरूळी, चिंबळी फाट्याला ते मोशीटोलनाक्यापर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 1 पर्यंत वाहतूककोंडी होत असते. पीएमपीएमएल व एस.टी. बसेस आडकल्या जातात. त्यामुळे प्रवाशीवर्ग हैराण झाला आहे. वाहतूक नियंत्रण पोलीस असुनही जड माल वाहतूक व अवैध प्रवाशीवर्ग वाहक वाहने वेडीवाकडी उभी असतात.