लोणावळा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रस्त्याने वाहन चालविणार्याच्या विरोधात लोणावळा पोलिसांकडून विशेष कारवाई सुरू करण्यात आली असून सोमवारी सकाळ केवळ दोन तासात 50 पेक्षा अधिक वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करीत साडेतेरा हजाराहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई सुरू आहे. सोमवार सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 10.30 वाजेपर्यंत शहरातील गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात यावी असे आदेश पारित करण्यात आले होते.
यांनी राबविली मोहीम
त्यानुसार लेन कटिंग, ट्रिपल सीट, राँगसाईड ड्रायव्हिंग, विनाहेल्मेट, ड्रंक अँड ड्राइव्ह, विना परवाना वाहन चालविणे, अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे या नियमांमध्ये दोषी ठरलेल्या चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार लोणावळा शहर पो.नि.चंद्रकांत जाधव यांच्या उपस्थितीत स.पो.नि. अरविंद काटे, पो.उप.नि. प्रकाश शितोळे या अधिकार्यांनी तसेच पो.हवा. सुरेश माने, शंकर मुळे, पो.ना. अनंत रावण, दत्तात्रय मसळे, सामील प्रकाश, संदीप शिंदे, होमगार्ड सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, अंकुश गायखे यांनी सदर मोहीम राबविली.