पिंपरी-चिंचवड :- रणरणत्या उन्हाळ्याच्या झळा अंगावर घेत वाहतूक पोलीस आपले कर्तव्ये पार पाडत आहे. उन्हाळापासून व पावसापासून संरक्षण होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मुख्य चौकांमध्ये पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने वाहतूक पोलिसांना मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमासाठी प्रदेशाध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, प्रदेश कार्याध्यक्ष गोपाल बिरारी, संपर्कप्रमुख हरिशआप्पा मोरे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल गाडेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष भावेश दाणी, युवक अध्यक्ष युवराज चिंचवडे, शुभम चिंचवडे, रवी जाधव, दत्ता भोई, प्रमोद नेवे, स्वप्नील वाघेरे, ओमकार भोसले, बालाजी भोई, गणपत सत्वधर, सचिन भोई, शेखर परदेशी, आखिल नेवे आदी उपस्थित होते.
पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस आर.एस. निंबाळकर निंबाळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सविता भागवत, चिंचवड वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक संजीव पाटील यांनी असोसिएशनचे कार्य प्रेरणादाई आहे. त्यांनी पोलीसांसाठी छत्री वाटप हा छान उपक्रम राबविला आहे, असे सांगितले.