भुसावळ। शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतली आहे. त्यात बुधवारी दिवसभरात 27 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हंबर्डीकर चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे, नाहाटा चौफुली आदी ठिकाणी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांनी दिवसभर थांबून 27 वाहनचालकांवर कारवाई केली. त्यापैकी 12 दुचाकी चालक ट्रीपल सीट, तर 15 जणांकडे वाहन परवान्यासह आवश्यक कागदपत्रे नव्हती. या सर्वांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. कारवाईदरम्यान काहींनी पुढार्यांचा ओळख परिचय दाखवला. मात्र, पोलिसांनी कोणतीही सबब ऐकता कारवाईवर जोर दिला.