सावदा : सावदा-कोचूर रस्त्यावर हॉटेल आराध्यासमोर मंगळवार, 3 रोजी सायंकाळी 7.40 वाजेच्या सुमारास वाहनाच्या धडकेत सलीम आदम तडवी (40) यांचा जागीच मृत्यू झाला.
चालकाविरोधात सावदा पोलिसात गुन्हा
मंगळवार, 3 सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास सावदा ते कोचूर रोडवर हॉटेल आराध्या समोर रोडवर मयत सलीम आदम तडवी (40) हे ट्रक (एच.आर.55 जे.8912) मध्ये केळी माल भरल झाल्यावर पाल टाकून दोरीने बांधत असतांना सावद्याकडून कोचुरकडे आयशर ट्रक (डी.डी.01 जी.9555) ने धडक दिल्याने सलीम तडवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात चालक पसार झाला.