चाळीसगाव । चाळीसगाव येथून औरंगाबादकडे आयशर मधून तब्बल 13 बैल निर्दयतेने कोंबून घेऊन जाणार्या आयशर सह 5 जणांना चाळीसगाव शहर पोलीसांनी 24 जानेवारी 2017 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास तालुक्यातील वाघडू गावी बस स्टॅड जवळ ताब्यात घेतले असून त्यांचेकडून 3 लाख 30 हजार रूपये किमतीची आयशर सह 13 बैल ताब्यात घेऊन 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले बैल बेलदारवाडी येथील गौशाळा येथे पाठविण्यात आले आहे.
तालुक्यातील वाघडू गावाजवळ संशय आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्यांनी गाडी तपासली असता, त्यात 3 लाख 30 हजार रुपये किमतीची आयशर सह तब्बल 13 बैल परमिट पेक्षा जास्त व त्या बैलांना यातना होतील अशा पध्दतीने निर्दयतेने व क्रूरतेने कोंबून भरलेले आढळल्याने पोलीसांनी आयशर चालक उमर फारूक अब्दुल रज्जाक (25) रा. रमजानपुर मालेगाव (नाशिक), मुजाहीद अहमद मरहम इकबाल अहमद (30 रा. नयापुरा मालेगाव नाशिक), सैय्यद मुन्ना सैय्यद मुस्तफा (24, नगरदेवळा बेडरपुरा ता. पाचोरा), तसेच चाळीसगाव येथील बैलांचे मालक मुन्ना कुरेशी व अशपाक कुरेशी यांना ताब्यात घेऊन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पोलीस कॉन्सटेबल संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बैल चाळीसगाव येथून औरंगाबाद येथे विक्री साठी घेऊन जात असल्याचे समजते. पुढील तपास पो.उ.नि. प्रशांत दिवटे करीत आहेत.