वाहने चोरणारे दोन चोरटे ताब्यात

0

निगडी: परिसरात होणार्‍या वाहन चोरीला आळा बसविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सापळ्यात सराईत गुन्हेगार व एका अल्पवयीन मुलास निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कारवाईत त्यांच्याकडून 93 हजारांच्या तीन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल उर्फ राजू पप्पू पवार (वय 19 रा. सिद्धार्थनगर, निगडी), असे ताब्यात घेतलेल्या सराईताचे नाव आहे. यासह एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

थरमॅक्स चौकात पकडले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयित तरूण थरमॅक्स चौकात उभे असल्याची बातमी मिळताच निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे पोलिसांनी दुचाकीबद्दल चौकशी केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पिंपरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी केली.