सावधान ! विना लायसन्स वाहन चालवले तर होणार “५” हजारांचा दंड

जळगाव – मोटार वाहन कायद्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामुळे वाहनचलकांनी वाहतूक नियम मोडल्यास त्यांचा खिसा रिकामा होणार आहे. विना लायसन्स वाहन चालवले तर आता चालकाला थेट 5 हजार रुपयांचा तर लायसन अपात्र केले असेल तर थेट 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

 

दुचाकीवर तीन सेट व वीरा हेल्मेट प्रवास केल्यास एक हजार रुपयाचा दंड होणार आहे तर वाहन चालकाचा लायसन्स देखील रद्द होणार आहे.

 

सध्या नागरिकांना वाहतूक नियम भंग केल्यावर दंड सहज पणे भरता येतो त्यामुळे दंडा बाबत नागरिकांमध्ये धाक नाही मात्र 12 डिसेंबर पासून रात्री बारा वाजे पासून याची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश प्राप्त करण्यात आले आहेत.