पाचोरा : पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे चारचाकी गाडी मागे घेतांना 48 वर्षीय प्रौढाला धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. रमेश परदेशी (48, रा. नांद्रा, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
धक्का लागल्याने एकाचा मृत्यू
नांद्रा, ता.पाचोरा येथे मारुती (इको क्रमांक एम.एच.19 सी. झेड. 6247) ही चारचाकी गाडी चालक आनंदा हिरामण भोई (रा.बांबरुड, महादेवाचे) हे मागे घेत असतांना मागील बाजूस काही अंतरावर रमेश परदेशी (48, रा.नांद्रा ता.पाचोरा) यांना वाहनाचा जोरदार धक्का लागल्याने परदेशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी मयताचा मुलगा शुभम रमेश परदेशी यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक आनंदा भोई याच्याविरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे करीत आहे.