विंडीजच्या ड्वेन स्मिथची आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

0

दुबई: वेस्ट इंडिजच्या 35 वर्षीय धडाकेबाज अष्टपैलू खेळाडूने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. स्फोटक फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या 35 वर्षीय ड्वेन स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्मिथने निवृत्तीचा निर्णय कराची किंग्ज संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी जाहीर केला. स्मिथने वेस्ट इंडीजसाठी अखेरचा सामना २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. 2003/04 मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. चौदा वर्ष आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथने वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व केले. स्मिथने विशेषता इंडियन प्रीमियर लीग मध्ये शानदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे.

आयपीएलमध्येही गुजरात संघाचे प्रतिनिधित्व
स्मिथ सध्या दुबईत सुरु असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. सेमीफायनलनंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. वेगवेगळ्या देशात खेळल्या जाणाऱ्या लीगमध्ये ड्वेन खेळत राहणार आहे. आयपीएलमध्येही सध्या तो गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. शतकी खेळी करत कारकीर्दीची सुरवात करणाऱ्या ड्वेनला आपल्या 10 कसोटीच्या छोट्या कार्यकाळात खास छाप सोडता आली नाही. मात्र टी-20 मध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले होते. स्मिथने वेस्ट इंडिजकडून शेवटचा एकदिवसीय सामना 2015 च्या विश्वचषकात खेळला होता. तर अखेरची कसोटी 2006 साली खेळली होती. मर्यादित षटकांच्या सामन्यातील आक्रमक फलंदाज म्हणून स्मिथची ओळख होती. स्मिथने १०५ एकदिवसीय सामन्यांत १५६० धावा आणि ६१ बळी मिळविले आहेत. त्याचा तीन टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये वेस्ट इंडीजच्या संघात समावेश होता. त्याने ३३ टी-२० सामन्यात ५८२ धावा केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्मिथ आयपीएल, कॅरेबियन प्रिमियर लीग, बांगलादेश प्रिमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे.